Login FormContent View Hits : 25722

Home ओमकार साधना
Print

|| श्री साईनाथ ||

कृपया ज्यांना साधना शिकायची आहे त्यांनी जवळच्या केंद्रावर संपर्क करावा व विडा लावून "गुरु आद्नेने" नियुक्त सेवकांकडून साधना शिकावी.

सि. डी. किंवा कॅसेटचा उपयोग करू नये.

१.   दीर्घ श्वसन ३ वेळा ( प्रत्येकी ३ सेकंद श्वास नाकाने आत घेणे व १० सेकंद श्वास तोंडाने बाहेर टाकणे )

२.   मंगलाचरण - स जयति सिंधुरवदनो... ( चिंतन मुद्रेत बसणे )

३.   शक्ती पीठ प्रार्थना - आम्ही गुरुभक्त जगतगुरू साईनाथ महाराज... ( चिंतन मुद्रेत बसणे )

४.   मारुती स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती... ( चिंतन मुद्रेत बसणे )

५.   २१ ओमकार, पाच सेकंदाचा १ या प्रमाणे ( ओमकाराच्या सूर, ताल व उच्चार , मध्य, लयी कडे लक्ष देणे )                                                       ( अवधान मुद्रेत बसणे )

                                      

६.   पाच प्रकारांचे न्यास, प्रत्येक न्यास पाच वेळा १० सेकंदाचा ओमकार म्हणत.                                                                                                    ( कृपया सर्व न्यास केंद्रावरील सेवका कडून शिकून घ्यावे ).

 

७.   सदगुरू नामस्मरण - ५ सेकंदाचा १ या प्रमाणे १०८ वेळा नामस्मरण. दोन नामस्मरणा मध्ये १ सेकंद थांबा.  ( अवधान मुद्रेत बसणे )

|| ॐ श्री साईनाथाय नमः ||

       सदगुरू नामस्मरणा नंतर महामंत्र म्हणण्या पूर्वी ३० सेकंद अवधान मुद्रेत बसून राहा.

 

८.   महामंत्र - २१ वेळा, १० सेकंदाचा एक या प्रमाणे. दोन महामंत्रा मध्ये १ सेकंद थांबा. ( चिंतन मुद्रेत बसणे )

   सर्व  मंगल  मांगल्ये,  शिवे  सर्वार्थ  साधिके |

    शरण्ये त्र्यंबके गौरी,  नारायणी  नमोsस्तुते ||

९.   तारक मंत्र - २१ वेळा, ७.५ सेकंदाचा एक या प्रमाणे. दोन तारक मंत्रा मध्ये १ सेकंद थांबा. ( चिंतन मुद्रेत बसणे )

|| ॐ श्री सुदगुरुनाथ दादाय नमः ||

१०.   दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे करून दृष्टी भ्रूमध्य ठिकाणी ठेवून एक मिनिट विचार रहित अवस्थतेत राहा.

११.   दोन्ही हाताचे तळवे जोडून म्हणा

सच्चिदानंद सद् गुरू साईनाथ महाराज की जय ||

श्री गुरुदेव दत्त || सदानंदाचा येळकोट ||

सच्चिदानंद सद् गुरू श्री पंत महाराज की जय

श्री गुरुदेव दत्त ||

श्री सद् गुरूनाथ दादा महाराज की जय ||

श्री गुरुदेव दत्त ||

१२.   दैनंदिन प्रार्थना - हे भगवंता नारायणा... म्हणावी.

साधने विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

साधना सूर

 

Powered by RemoSystems!. Designed by: marketing tools domain park Valid XHTML and CSS.